पुणे

Porsche accident : आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार; ‘ससून’च्या २ डॉक्टरांना अटक

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केलीय. ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणातदेखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित होवू लागले आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT