NCP Split Pudhari
पुणे

NCP Split: शिरूर तालुक्यात राष्ट्रवादीतील फूट, भाजपची घटलेली ताकद; निवडणुकीत अनिश्चिततेचे चित्र

अजित पवार व शरद पवार गटांतील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीला सुरुवात

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत मैड

शिक्रापूर: शिरूर तालुक्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग््रेासमधील मोठी फूट आणि भारतीय जनता पक्षाची स्थानिक पातळीवरील कमकुवत झालेली संघटनात्मक स्थिती या दोन प्रमुख घटकांमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगरपरिषदा, नगरपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका अत्यंत अनिश्चिततेच्या वळणावर आहेत. (Latest Pune News)

एकत्रित राष्ट्रवादी काँग््रेास पक्ष असताना निवडणुकीमध्ये त्यांची लढत प्रामुख्याने भाजपा आणि शिवसेनेबरोबर होत होती. एकत्रित राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे स्थानिक संस्थांवर वर्चस्व होते. शिरूर तालुका हा आंबेगाव व शिरूर-हवेली अशा दोन मतदारसंघात विभागला गेला होता. यामुळे शिरूरला जोडलेल्या 39 गावांतील उमेदवार ठरविण्यात दिलीप वळसे पाटील तर शिरूर-हवेलीतील उमेदवार माजी आमदार अशोक पवार भूमिका बजावत होते. तसेच सत्तास्थानांचे वाटपदेखील अडीच-अडीच वर्षे तसेच सभापती व उपसभापतीपद दिलीप वळसे पाटील व अशोक पवार यांच्यामध्ये विभागले जात होते. परंतु आता पक्ष फुटीत दोघांचीही ताकद विभागली गेली. यामुळे स्थानिक संस्थांमध्ये कोण बाजी मारणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग््रेास आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार) असे दोन गट पडल्यामुळे शिरूरमधील राष्ट्रवादीचे पारंपरिक मतदार आणि स्थानिक कार्यकर्ते दुभंगले आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघात अजित पवार गटाचे ज्ञानेश्वर तथा माऊली आबा कटके यांनी शरद पवार गटाचे अशोक पवार यांचा पराभव केला.

या निकालाने कटके गटाचे मनोबल वाढवले असले तरी, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ‌‘पवार‌’ या नावावर निष्ठा असणारा मोठा वर्ग अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहे. या फुटीमुळे दोन्ही गटांना स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे उमेदवार उभे करावे लागणार आहेत. यामुळे मतांचे विभाजन निश्चित आहे; मात्र ग््राामीण भागातील ग््राामपंचायत किंवा सेवा सोसायटीच्या निवडणुका या पक्षापेक्षा वैयक्तिक संबंध आणि उमेदवाराच्या ताकदीवर जास्त अवलंबून असतात. त्यामुळे दोन्ही गटांतील ‌‘दादा‌’ लोकांची ताकद ही त्यांची खरी कसोटी असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT