पुणे : कमी बजेटमध्ये जास्त फीचर्स हवे असलेल्या ग्राहकांसाठी POCO ने भारतात पोको एम8 5G लाँच केला आहे. हा फोन दिसायला स्लिम आहे, वजनाने हलका आहे आणि रोजच्या वापरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मनोरंजन, सोशल मीडिया, काम, गेमिंग आणि फोटोग्राफी अशा सगळ्यासाठी एकाच फोनमध्ये चांगले फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.
पोको एम8 5G मध्ये 6.7 इंचाचा Flow AMOLED कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे. 120Hz रिफ्रेश रेट असल्यामुळे स्क्रोलिंग स्मूथ वाटते. 3200 निट्स ब्राइटनेस मुळे उन्हातही स्क्रीन नीट दिसते. या किंमतीत असा डिस्प्ले मिळणं हे या फोनचे खास फीचर आहे.
ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि Dolby Atmos सपोर्टमुळे व्हिडिओ पाहताना, कॉल्स करताना आणि गाणी ऐकताना आवाज मोठा आणि स्पष्ट येतो. हेडफोन न लावता देखील चांगला अनुभव मिळतो.
फक्त 7.35 मिमी जाडी आणि 178 ग्रॅम वजन असल्याने फोन हातात धरायला हलका वाटतो. एकाच हाताने वापर करणं सोपं होतं.
फोनला IP66 डस्ट आणि वॉटर रेसिस्टन्स आहे. म्हणजे धूळ, पाणी किंवा हलक्या पावसातही फोन सुरक्षित राहतो. वेट टच टेक्नॉलॉजी मुळे ओल्या हातांनीही स्क्रीन नीट काम करते.
SGS MIL-STD-810H सर्टिफिकेशनमुळे हातातून पडणे आणि सततचा प्रवास हा फोन सहज सहन करतो. त्यामुळे कॉलेज, ऑफिस किंवा बाहेर जास्त फिरणाऱ्यांसाठी हा फोन परफेक्ट ठरतो.
Snapdragon 6 Gen 3 प्रोसेसर मुळे मेसेजिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि कामाची अॅप्स फोन आरामात हाताळतो. रोजच्या वापरात फोन स्लो वाटत नाही.
पोको एम8 5G मध्ये 5520mAh बॅटरी आहे. एकदा चार्ज केल्यावर फोन दिवसभर चालतो. 45W फास्ट चार्जिंग मुळे फोन पटकन चार्ज होतो. बॉक्समध्ये चार्जर मिळतो. 18W रिव्हर्स चार्जिंग मुळे इतर डिव्हाइसही चार्ज करता येतात.
50MP ड्युअल AI रियर कॅमेरा चांगले फोटो काढतो. 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग (30fps) ची सुविधा आहे. समोरचा 20MP सेल्फी कॅमेरा व्हिडिओ कॉल्स, मीटिंग्स आणि सेल्फीसाठी उपयुक्त आहे.
धूळ, पाऊस, प्रवास आणि दीर्घ वापर लक्षात घेऊन हा फोन डिझाइन करण्यात आला आहे. हलकी स्लिम बॉडी आणि मजबूत बॅटरीमुळे रोजच्या वापरासाठी तो योग्य ठरतो.
पोको एम8 5G Android 15 आधारित HyperOS 2 वर चालतो. कंपनी 4 वर्षांचे Android अपडेट्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. या बजेटमध्ये हे फार कमी फोन देतात.
6GB + 128GB: ₹15,999 (MRP ₹18,999)
8GB + 128GB: ₹16,999 (MRP ₹19,999)
8GB + 256GB: ₹18,999 (MRP ₹21,999)
ICICI, HDFC आणि SBI बँक कार्ड्सवर ₹2,000 इन्स्टंट कॅशबॅक उपलब्ध आहे.
मोठा AMOLED डिस्प्ले, हलकी पण मजबूत बॉडी, चांगली बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि अपडेट सपोर्ट या सगळ्यामुळे पोको एम8 5G हा मिडरेंज स्मार्टफोनमध्ये पैसे वसूल आणि विश्वासार्ह पर्याय आहे.