पुणे : पीएमपीएमएलच्या पर्यटन बससेवा क्र. 6 मध्ये यवतमधील दरेकरवाडा व पर्यटन बससेवा क्र. 7 मध्ये मोराची चिंचोली व पाबळगाव येथील पदमणी जैन श्वेतांबर मंदिर आणि मस्तानी समाधी स्थळाचा समावेश करण्यात आला आहे.
पीएमपीएमएल अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांच्या आदेशानुसार प्रेक्षणीय स्थळांमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. या सेवेचा पर्यटक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.