पुणे : प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमआरडीए आणि जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी पीएमपीकडून ‘हात दाखवा आणि बस थांबवा’ हा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. पीएमपी अध्यक्ष पंकज देवरे यांची ही संकल्पना असून, याचा फायदा वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.(Latest Pune News)
जिल्ह्याचा बराचसा भाग आता पीएमआरडीएच्या हद्दीत गेला आहे. या भागात आता पीएमपीची बससेवा सुरू झाली आहे. मात्र, अजूनही काही वाड्या-वस्त्यांना अधिकृत असा बस थांबा नाही, त्यामुळे वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना बस पकडण्यासाठी गावाच्या मुख्य थांब्यांपर्यंत जावे लागते. कधी-कधी हे थांबे खूपच लांब असतात, तिथपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना काही किलोमीटर पायपीट करावी लागते.
अनेकदा या वाड्या-वस्त्या बसच्या रस्त्यावर असतात, मात्र, येथे अधिकृत बस थांबा नसल्यामुळे तेथे बस थांबतच नाही. परिणामी, येथे राहणाऱ्या रहिवाशांना प्रवासासाठी गावाच्या मुख्य थांब्यापर्यंत चालत जावे लागते. अशा नागरिकांसाठीच जिल्हा, पीएमआरडीए भागात पीएमपीएमलचे अध्यक्ष पंकज देवरे यांनी ‘हात दाखवा अन् बस थांबवा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
...तर नागरिक पीएमपीचालकाविरोधात करू शकणार तक्रार
अगदी पूर्वीपासून एका गावामध्ये कमीत कमी चार ते पाच वाड्या असतात. बस थांबा मुख्य रस्त्यावर असतो, तर तेथून आतमध्ये मुख्य गावठाण आणि आजूबाजूला वाड्या असतात. काही वाड्या तर मुख्य रोडलाच असतात. मात्र, त्यांचे पोस्ट, शाळा, सरकारी दवाखाना आणि थांबा मुख्य गावातच असतो. त्यामुळे काही वाड्या मुख्य रस्त्यालगत असतात. या रस्त्यावरून पीएमपी बस जाते, मात्र बस गाठण्यासाठी काही किलोमीटर अंतरावर असलेल्या अधिकृत थांब्यावर जावे लागते. ही पायपीट थांबविण्यासाठी अधिकृत थांब्यासह वाड्या-वस्त्यांवरही बसला हात दाखवून, बस थांबविता येणार आहे. जर बस थांबली नाही, तर या नागरिकांना पीएमपीच्या
प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही ‘हात दाखवा अन् बस थांबवा’ हा उपक्रम लवकरच राबविणार आहोत. जिल्ह्यासह पीएमआरडीएच्या काही भागांत हा उपक्रम आम्ही राबविणार आहोत. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे. खास करून जिल्ह्यातील नागरिकांना याचा फायदा होईल. लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल