

Alumni Association Mendatory in Maharashtra Schools
पुणे : राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, खासगी अनुदानित, विनाअनुदानित सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.त्यानुसार आता सर्व शाळांमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांची संघ समिती स्थापन करण्यात येणार आहे. शाळांचा, विद्यालयांचा दर्जा उंचावण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे तसेच माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे हा उद्देश आहे.(Latest Pune News)
राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा स्तरावर माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याबाबत व माजी विद्यार्थी मेळावे, स्नेहसंमेलने आयोजित करण्याबाबत सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना आवाहन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये (इयत्ता 1 ली ते 12 वी) शाळेतील माजी विद्यार्थ्यांना एकत्र करून त्या विद्यार्थ्यांचा ‘माजी विद्यार्थी संघ’ स्थापन करण्यात यावा, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
शासन या उपक्रमासाठी धोरणात्मक पाठबळ व समन्वय उपलब्ध करून देईल. शाळांनी नियोजित मेळावे, स्नेहसंमेलन आयोजनासाठी आवश्यक खर्चाची प्रतिपूर्ती वेतनेतर अनुदान, इतर निधीतून करावी असे शासन निर्णयात नमूद केले आहे.
काय आहे शासकीय भूमिका?
शाळांचा, विद्यालयांचा दर्जा उंचवण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढविणे.
माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या, विद्यालयांच्या शैक्षणिक विकासात थेट सहभागी करून घेणे.
शिक्षणाचा दर्जा ग््राामीण व शहरी भागात समान रीतीने उंचावण्यास मदत करणे. प माजी विद्यार्थ्यांचे शाळा, विद्यालयासोबत असणारे ऋणानुबंध घट्ट करणे. प माजी विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या
यशापासून शाळेमध्ये, विद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे.
माजी विद्यार्थी संघ समितीची रचना
माजी विद्यार्थी संघासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवडलेला शाळेचा माजी विद्यार्थी/ विद्यार्थी असेल, तर सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक असतील. तसेच सदस्य हे स्थानिक व नोकरी, उद्योग, व्यवसायासाठी बाहेरगावी स्थायिक असणारे माजी विद्यार्थी असतील.
शाळेचे एक उपक्रमशील शिक्षक, अध्यापक, मुख्याध्यापक, प्राचार्य प्रतिनिधी, एक पालक प्रतिनिधी, एक सेवानिवृत्त अधिकारी व एक सेवानिवृत्त शिक्षक हे सल्लागार म्हणून काम बघतील.
संबंधित शाळेत शिक्षण घेतलेला कोणताही माजी विद्यार्थी ऑनलाइन, ऑफलाइन नोंदणी करून संघाचे सभासदत्व घेऊ शकेल.
प्रत्येक शाळेत शासनाने पुरविलेल्या ऑनलाइन प्रणालीवर माजी
विद्यार्थी सदस्यांची नोंदणी करण्यात यावी तसेच शाळेच्या स्तरावर
सदस्यांची यादी ठेवण्यात यावी.
माजी विद्यार्थी संघाचा मेळावा, स्नेहसंमेलन वर्षातून किमान एक वेळा आयोजित करण्यात यावे.
माजी विद्यार्थी संघ समितीच्या वर्षातून किमान 2 बैठका घेण्यात याव्यात. आवश्यकता असेल तेव्हा या समितीची बैठक सदस्यांच्या सोयीनुसार सर्वसंमतीने ऑनलाइन प्रणालीद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने आयोजित करावी.