पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाकडून मेट्रो प्रवाशांकरिता नुकतीच आठ मार्गांवर फीडरसेवा सुरू करण्यात आली आहे. या
सेवेला प्रवाशांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून, पीएमपीला अवघ्या 15 दिवसांतच 2 लाख रुपयांचे फीडरसेवेद्वारे उत्पन्न मिळाले आहे. या काळात 20 हजारांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच मेट्रोच्या दुसर्या टप्प्याचे उद्घाटन झाले. त्या पार्श्वभूमीवर मेट्रो अधिकारी आणि पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी एकत्रित पाहणी करून मेट्रो प्रवाशांकरिता फीडरसेवा सुरू केली. त्या सेवेच्या माध्यमातून प्रशासनाला दिनांक 3 ते 17 ऑगस्ट 2023 या 15 दिवसांच्या कालावधीत हे दैनंदिन उत्पन्नाव्यतिरिक्त अधिकचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे पीएमपीला दिलासा मिळाला आहे.
मेट्रो प्रवाशांसाठी सुरू केलेल्या फीडरसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मेट्रोसाठी आणखी काही मार्गांवर फीडरसेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. पुन्हा याबाबत पाहणी करून मार्ग निश्चित केले जातील आणि त्यानंतर फीडरचे आणखी मार्ग सुरू केले जातील.
– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
हेही वाचा