पुणे: भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) अस्सल स्वदेशी तंत्रज्ञान वापरून मोबाईलसाठी लागणारी 4-जी यंत्रणा तयार केली आहे. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी, 27 सप्टेंबर रोजी ओडिशा राज्यातील झारगुडा येथून करणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख कार्यक्रम पुणे शहरात होणार असून, या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘बीएसएनएल’चे राज्याचे मुख्य महाव्यवस्थापक (मुंबई) हरेंद्र कुमार यांनी दिली.
सध्या भारतात अनेक खासगी मोबाईल कंपन्यांचे 5-जी नेटवर्क आहे. मात्र, ते विदेशी तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे आत्मनिर्भर भारत या संकल्पात 2020 पासून स्वदेशी 4- जी तंत्रज्ञान विकसित करण्याची तयारी सुरू झाली. (Latest Pune News)
यात बीएसएनएल, सी-डॉट, टीसीएस या कंपन्यांचे तांत्रिक साहाय्य मिळाले आहे. ही माहिती ‘बीएसएनएल’चे महाव्यवस्थापक हरेंद्र कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, बाजारात सध्या इतर अनेक खासगी कंपन्याची 5-जी सेवा आहे. मात्र, ती विदेशी यंत्रणा आहे. आपण स्वदेशी 4-जी यंत्रणा विकसित केली, त्याची गती 5-जी सारखीच आहे, तरीपण लवकरच 5-जी आणि 6-जी यंत्रणा वेगाने विकसित होणार आहे.
‘4-जी’साठी ‘बीएसएनएल’ने विकसित केली यंत्रणा
बीएसएनएल देशभरात 97 हजार 500 नवे सौरटॉवर विकसित करणार
26 हजार 700 गावे दुर्गम, नक्षल प्रभावित, सीमाभाग जोडले जाणार
नवे 20 लाख ग्राहक जोडले जाणार
27 सप्टेंबर रोजी शनिवारी सकाळी 10 वाजता पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आसाममधील गुवाहाटी येथून विविध राज्यांत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार उद्घाटन.
महाराष्ट्रातील सेवेचा प्रारंभ पुणे शहरातील येरवडा भागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील.
बीएसएनएलचे आर्थिक पुनरुज्जीवन होणार.
3.22 लाख कोटींचे स्पेक्ट्रम वाटप केल्याने उत्पन्न 20 हजार 841 कोटींवर पोहोचले आहे. (7.8 टक्के वाढ)
बीएसएनएलचे 4-जी ग्राहकसंख्या 80 लाखांवरून 2 कोटींवर गेली आहे.
महाराष्ट्राची प्रगती
बीएसएनएल महाराष्ट्रात नवे 9 हजार 139 टॉवर उभारणार
राज्य सरकारने सुमारे 2 हजार
751 टॉवरसाठी मोफत जमीन व मोफत वीज उपलब्ध करून दिली आहे.