पुणे

Ashadhi wari 2023 : वारीसाठी बारामतीतून जादा गाड्यांचे नियोजन

अमृता चौगुले

बारामती(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त बारामती एसटी आगाराकडून पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती बारामती आगारप्रमुख वृषाली तांबे यांनी दिली. बारामती आगाराच्या 20 आणि एमआयडीसी आगाराच्या 8 अशा एकूण 28 एसटी बस प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

दि. 28 आणि 29 जून अशा दोन दिवस या गाड्या बारामती आगारातून पंढरपूरला सोडण्यात येणार आहेत. एसटी बसची सोय उपलब्ध करून दिल्याने प्रवाशांना थेट बारामती ते पंढरपूर असा सुरक्षित प्रवास घडणार आहे. प्रवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. 40 ते 45 प्रवाशांचा ग्रुप एकत्रित जाणार असेल, तर त्यांच्यासाठीही बुकिंग करून एसटीची सेवा देण्यात येणार आहे.

यासाठी अगोदर बुकिंग करावे लागणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून दररोज पाच ते सहा एसटी बस बारामतीतून पंढरपूरला प्रवासी घेऊन ये-जा करीत आहेत. तालुक्यातील विविध मार्गांवरील 28 एसटी बस आषाढी एकादशीनिमित्त बंद करून त्या पंढरपूरला सोडण्यात येत आहेत. त्यामुळे दोन दिवस अन्य मार्गांवर प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन आगारप्रमुख तांबे यांनी केले आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT