पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गुटखा विक्री प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारने एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून 50 हजारांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
तसेच, तरुणाला गुटखा पुरविणार्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि. 2) रात्री सातच्या सुमारास काळेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.
मोहित प्रभाकर कानडे (22, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पावबा चव्हाण (रा. धोंडाईचा, धुळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार तुषार शेटे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी सोमवारी रात्री छापा मारला.
त्यावेळी 50 हजार 420 रुपयांचा गुटखा मिळून आला. मोहित कानडे याने हा गुटखा पावबा चव्हाणाकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला.