पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : आई वडिलांना मारण्याची धमकी देऊन एकाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 3 एप्रिल रोजी पहाटे सांगवी परिसरात घडली.
याप्रकरणी पीडितेच्या आईने 13 एप्रिलला सांगवी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार 14 वर्षीय मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांची तेरा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात झोपली असताना आरोपी मुलगा जबरदस्तीने घुसला. त्याने मुलीला कात्रीचा धाक दाखवला. त्यानंतर आई, वडिलांना मारण्याची धमकी देत मुलीवर लैंगिक अत्याचार केले.