पुणे

पिंपरी : तृतीयपंथीयांना महापालिकेकडून मिळणार हक्काचा रोजगार

backup backup

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : समाजातील अतिशय उपेक्षित घटक म्हणून ओळखल्या जाणार्‍या तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड महापालिका करत आहे. या प्रयत्नाचा भाग म्हणून सुरक्षा रक्षक तसेच शहरातील उद्यान देखभाल दुरुस्तीचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरात तृतीयपंथीयांची संख्या सुमारे तीन हजार इतकी आहे. यातील अनेक जण पुणे-मुंबई महामार्गावर चौकाचौकात उभे राहून वाहनचालकांकडून पैसे मागून आपला उदरनिर्वाह चालवतात.

मात्र, या तृतीय पंथीयांना यातून बाहेर काढून सन्मानाची वागणूक मिळावी त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे यासाठी विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीत. पिंपरी चिंचवड महापालिकेने मात्र, आता तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पावले उचलली आहेत.

तृतीयपंथींना सन्मानाने जगता यावे, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. त्यासाठी 2022-23 च्या अर्थ संकल्पात तृतीय पंथी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी 25 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

रोजगार उपलब्ध झाल्यास ते सन्मानाने जगू शकतात, यासाठी नामांकित संस्थांमार्फत कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे,

असे आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिनानिमित्त महापालिकेतर्फे चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमात आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले होते. त्यानुसार पालिकेची वाटचाल सुरू आहे.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत तृतीयपंथीयांना कोणीही सन्मानाची वागणूक देत नाही ते जवळ आले तरीही नागरिक उठून बाजूला जातात, हे चित्र बदलण्यासाठी महापालिकेने तृतीयपंथीयांना मेट्रो सफर घडवून आणली.

पालिकेने सुरक्षा रक्षक तसेच उद्यान देखभाल दुरुस्तीचे काम त्यांच्याकडे देण्याचे ठरविले आहे. त्यातून तृतीयपंथीयांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध होण्याबरोबरच

महापालिका एक खिडकी योजना राबवणार

तृतीय पंथीयांना त्यांची समस्या मांडता यावी यासाठी महापालिका एक खिडकी योजना राबवणार आहे. त्यासाठी एक अधिकारी व कर्माचार्‍यांची नियुक्ती केली जाणार आहे. तृतीय पंथीयांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

मनपा रुग्णालयामध्ये त्यांना विनामूल्य सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे शहरातील झोपडपट्टी भागामध्ये महापालिकेने उभारलेल्या स्वच्छतागृहांची स्वच्छता, सुरक्षा रक्षक, उद्यान देखभालीचे काम त्यांना देण्यात येणार आहेत.

तृतीय पंथीय हा समाजाचाच एक घटक, भाग आहे. मात्र, त्याला आजही सन्मानाची वागणूक दिली जात नाही. त्यामुळे या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्याचा, त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी सुरक्षारक्षक, उद्यान देखभाल दुरुस्तीचे काम त्यांच्याकडे देण्यात येणार आहे.
-अजय चारठणकर, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT