पुणे

पिंपरी : विवाहितेवर लैंगिक अत्याचार; एकास अटक

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. ही घटना 30 एप्रिल रोजी मोशी येथे घडली.जुबेर अहमद खुर्शीद अन्सारी (24, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 3) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 30 एप्रिल रोजी पीडित महिला आपल्या मुलांसह घरात झोपली होती.

त्यावेळी आरोपी जबरदस्तीने तिच्या घरात घुसला. तू माझ्याशी इन्स्टाग्रामवर बोलतेस ते तुझ्या नवर्‍याला सांगेल, अशी धमकी दिली. त्यानंतर विवाहितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच, याबाबत कोणास सांगितले तर तुला बघून घेईन, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

https://youtu.be/uRpprmHUGnM

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT