पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवणार्या दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दोन महिलांची सुटका करण्यात आली.
हॉटेल ओयो टाऊन हाऊस, पुणे बेंगलोर हायवे, वाकड येथे शनिवारी (दि.9) कारवाई करण्यात आली. याबाबत पोलीस नाईक मोहम्मद गौस नदाफ यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरून राज व आयशा अशी नावे असलेल्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालवित होते. पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून दोन महिलांची सुटका करून, दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.