पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : काळेवाडीहुन ते चिचंवडगावकडे जाणार्या नदीच्या पुलावरील पदपथाची दुरवस्था झाली आहे. याठिकाणी पदपथावर सिमेंट ब्लॉक बसविण्यात आले आहेत. हे ब्लॉक निघाल्यामुळे पदपथावरून चालणे धोकादायक झाले आहे.
काळेवाडी ते चिंचवड गावाकडे जाणार हा नेहमी वर्दळीचा आहे. चिंचवड गावात असणारी बाजारपेठ आणि काळेवाडीमध्ये असलेल्या मॉल यामुळे याठिकाणी दोन्ही परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात.
त्यासोबतच या ठिकाणी महाविद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी आहे. पदपथावर असलेले ब्लॉक निघाल्याने पादचार्यांना अपघात घडु शकतो. पादचार्यांना चालण्यासाठी हा पदपथ धोकादायक झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पदपथाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.