पुणे

पिंपरी : एसटी रुळावर; लोकल विस्कळीत !

backup backup

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पिंपरी-चिंचवड विभागात लालपरीची सेवा सुरू झाली असून, 50 पैकी 30 बस मार्गावर सुरू झाल्या आहेत.

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध मागे घेतल्याने 90 टक्के रेल्वेगाड्या धावू लागल्या आहेत. मात्र, अजूनही पुरेसे प्रवासी नसल्याने पुणे लोणावळा लोकलच्या 42 पैकी 26 रेल्वेगाड्या रुळावर आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा संप संपल्यात जमा आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सर्व कर्मचार्‍यांना 22 एप्रिल रुजू होण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

त्या सूचनेप्रमाणे कर्मचारी हळूहळू कामावर हजर होत आहेत. मंगळवारपर्यंत 70 टक्के म्हणजेच 130 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमधून तुळजापूर, सोलापूर, उमरगा, लातूर , हैदराबाद, पंढरपूर ,दापोली, चिपळूण, तीवरे, महाड, नाशिक, विजापूर, गाणगापूर या मार्गावर एकूण 50 पैकी 30 बस सुरू झाल्या आहेत, अशी माहिती स्थानकप्रमुख गोविंद जाधव यांनी दिली. कोरोनाचे निर्बंध राज्य सरकारने मागे घेतल्याने रेल्वेच्या 90 टक्के गाड्या रुळावर आल्या आहेत.

260 पैकी 230 एक्स्प्रेस मार्गावर धावू लागल्या आहेत. मात्र, पुणे-लोणावळा लोकल संख्या अतिशय कमी आहे. 42 पैकी केवळ 26 लोकल रेल्वेगाड्या धावत आहेत.

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे 260 पैकी 230 एक्स्प्रेस धावू लागल्या आहेत. पुणे-लोणावळा रेल्वेगाड्यांना प्रवासीसंख्या कमी आहे.केवळ 40 टक्के प्रवासी लोकलमध्ये असतात, तरीही पूर्ण क्षमतेने लोकल सुरू करण्याबाबत डिव्हिजनला अधिकार नाही. मुख्यालय याबाबत निर्णय घेऊ शकते.
– मनोज जवर,
जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे

पिंपरी-चिंचवड विभागातील एसटीचे 70 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. पूर्वी 50 बस धावत होत्या. आता 30 बसमार्गांवर धावू लागल्या आहेत. 22 एप्रिलपर्यंत आणखी कर्मचारी कामावर येतील. लवकरच पूर्ण क्षमतेने बस मार्गावर येतील. पूर्वी एसटीने दररोज साडेतीन हजार जण प्रवास करीत, आता 2100 जण प्रवास करीत आहेत.
-गोविंद जाधव, स्थानकप्रमुख, पिंपरी-चिंचवड, वल्लभनगर डेपो

पुणे-लोणावळा लोकलची संख्या कमी केल्याने गैरसोय होत आहे. रेल्वे स्टेशनवर दोन दोन तास थांबावे लागते. पुण्याहून सकाळी अकराची लोकल गेल्यानंतर थेट दुपारी तीन वाजताची लोकल आहे. त्यामुळे खोळंबा होतो.
– साक्षी शिंब्रे, प्रवासी विद्यार्थिनी

कोरोनाची लाट ओसरली, तरी पुणे- लोणावळा लोकलसंख्या वाढवली गेली नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
-मिताली भिरुड, प्रवासी

https://youtu.be/1fkBjdzzX90

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT