पुणे

Pimpri News : ‘वॉर्ड अ‍ॅण्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन’अंतर्गत टास्क फोर्स’

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लान- टास्क फोर्स समितीचे कामकाज कार्यक्षमतेने होण्याकरिता व महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालय तसेच दवाखाने यांना भेडसावणार्‍या दैनंदिन समस्यांचा निपटारा क्षेत्रीय कार्यालय स्तरावर करण्यासाठी वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन- टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष म्हणून क्षेत्रीय अधिकार्‍यांची निवड करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त क्षेत्रीय कार्यालयांना आर्थिक स्वरूपाचे वित्तीय अधिकार सोबतचे प्रपत्र अ नुसार प्रदान करण्यास मान्यता देण्यता आली आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.

8 रुग्णालय झोन स्तरावर निश्चित

मार्गदर्शक सूचनांनुसार अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी युनिसेफ व यशदा या संस्थांसमवेत बैठका घेवून वैद्यकीय विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. पालिकेच्या भौगोलिक कार्यक्षेत्र कामकाजाचे सोईनुसार निवडणूक वॉर्डनिहाय आठ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये विभागण्यात आले आहेत. वैद्यकीय विभागामार्फत राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणी करीता 8 रुग्णालय झोन स्तरावर निश्चित करण्यात आले आहेत.

वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर क्षेत्रीय अधिकारी यांना वित्तीय अधिकार प्रदान करून वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅनच्या अनुषंगाने सर्व कामकाज करण्यात येणार आहे. हे कामकाज करण्याकरिता संबंधित रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय कार्यालयाची कार्यकारी अभियंता, स्थापत्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज व क्षेत्रीय अधिकारी यांची संयुक्तपणे समिती स्थापन
केली आहे.

आराखडा तयार करण्याकरिता समितीची स्थापना

राज्यातील प्रत्येक महापालिकेने राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) द्वारे प्रदान केलेल्या सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन
आराखड्यावर काम करावे, अशा सूचना राज्य शासनामार्फत दिल्या गेल्या आहेत. त्यानुसार महापालिका स्तरावर 'वॉर्ड अ‍ॅण्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन' तयार करण्याकरिता युनिसेफच्या मदतीने प्रायोगिक तत्वावर पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवड करण्यात आली आहे. वॉर्ड अ‍ॅन्ड सिटी हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅनमधील तत्त्वे भविष्यात महाराष्ट्रात मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून वापरण्यात येणार आहेत. हा आराखडा तयार करण्याकरिता 'वॉर्ड हेल्थ अ‍ॅक्शन प्लॅन टास्क फोर्स' समितीची स्थापना करण्यात आली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT