पुणे

Pimpri News : घरेलू कामगारांसाठी राज्यव्यापी लढा उभारणार

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांकडे सरकारचे दुर्लक्ष झालेले आहे. महामंडळ अस्तित्वात असतानाही त्याला निधी न देता निष्प्रभ करण्याचा प्रयत्न होत आहे. घरेलू कामगारांना निर्वाह निधी, आरोग्य विमा, सामाजिक सुरक्षासह इतर लाभ देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी राज्यव्यापी लढा उभारण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. या आंदोलनाची सुरुवात 15 डिसेंबर रोजी नागपूर येथे महामोर्चा काढून करण्यात येणार आहे.

त्यानंतर मुंबई येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचा ठराव महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे आयोजित बैठकीत करण्यात आला. या वेळी निमंत्रक राजू वंजारे, संयोजक ज्ञानेश पाटील, कामगार नेते काशिनाथ नखाते, सर्वश्रमीकचे उदय भट, भावना वाघमारे, भाग्यश्री रणदिवे, विलास भोंगाडे, विजय स्वामी, शोभा पवार, संजीवनी शिंदे, द्वारका पवार आदी उपस्थित होते. संतोष थोरात यांनी प्रास्ताविक केले. मीरा सपकाळे यांनी सूत्रसंचालन केले. तर, किरण साडेकर यांनी आभार मानले.

सरकारचे कामगारांकडे दुर्लक्ष

राज्यातील घरेलू कामगारांच्या प्रश्नांसाठी समन्वय समिती अनेक वर्षांपासून काम करत आहे. सन 2011 च्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या परिषदेमध्ये घरेलू कामगार यांना कामगार म्हणून ठराव संमत केलेला आहे. राज्यामध्ये घरेलू कामगारांचे मंडळ आहे. सरकारचे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. त्यांना निधी देत नाही आणि इतर लाभही देत नाही अशा परिस्थितीमध्ये घरेलू कामगारांचे जीवन अत्यंत असुरक्षित झालेले आहे. त्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी शासनस्तरावर लवकरात लवकर प्रयत्न न झाल्यास मुंबई येथे मोठे आंदोलन करण्यात येईल, असे नियोजन बैठकीत ठरले.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT