पुणे

Pimpri News : आरोग्य कर्मचार्‍यांचा बेमुदत संप; क्षयरुग्ण सलाईनवर !

Laxman Dhenge

आकुर्डी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात 3 नोव्हेंबरपासून आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचा संप सुरू आहे. त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून शहरातील क्षयरुग्ण जणू काही सलाईनवर गेल्याचे दिसून येत आहे. कर्मचार्‍यांच्या संपावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी केली आहे.

ज्या रुग्णाचे क्षयरोगाचे निदान झाले आहे, त्याचा पाठपुरावा पूर्णपणे थांबला आहे. दरम्यान, दिवाळी सण असताना आमच्या हक्काच्या मागणीसाठी संप करावा लागत असल्याची खंत कर्मचार्‍यांनी व्यक्त केली. जे रुग्ण तपासणीसाठी येत नव्हते, त्यांना फोन करून बोलवून घेतले जात होते. तसेच घरातील 15 वर्षांपेक्षा लहान असलेल्यांनाही औषधे दिली जात होती. थुंकी तपासणीसाठी दर महिन्याला फोन करून पाठपुरावा केला जात होता. औषधे वेळेवर घेत असल्याची नोंद ठेवली जात होती.

तो संप सुरू असल्यामुळे आता पूर्णपणे बंद आहे. गेल्या वीस वर्षांपासून आरोग्य सेवा देत असलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमातील वैद्यकीय अधिकारी / कर्मचारी यांनी शासन सेवेत समायोजन करावे, या मागणीसाठी संपूर्ण राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील जुने आकुर्डी रुग्णालयामध्ये दि. 3 नोव्हेंबरपासून 46 वैद्यकीय कर्मचारी यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाचा आज 8 दिवस आहे. सदर काम बंद आंदोलनाचा परिणाम क्षयरुग्ण सेवेवर झाल्याचे यामुळे दिसून आले.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे एकूण 8 मोठे रुग्णालये आणि 32 दवाखाने आहेत.

यामध्ये एकूण 2000 रुग्णांपेक्षा क्षयरोगाचे अधिक रुग्ण उपचार घेत असून, संशयित रुग्णांची तपासणी करणे, त्यांना उपचार देणे, आंदोलनामुळे रुग्णसेवा पूर्णपणे खोळंबली असून, सदर रुग्णांची हेळसांड होत आहे. एकीकडे क्षयरुग्णांना योग्य उपचार देण्याची गरज असताना आरोग्य कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. क्षयरोग विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे त्वरित समायोजन करावे, तसेच समायोजन प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'समान काम समान वेतन' द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

समान काम समान वेतनाची मागणी

राज्यव्यापी बेमुदत आंदोलनाच्या मागणीनुसार समायोजन झालेच पाहिजे व जोपर्यंत समायोजन होत नाही, समान काम समान वेतन मिळण्याबाबतचा लेखी निर्णय मिळत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन चालूच ठेवण्याचे निवेदन आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना देण्यात आले आहे.

शासनाच्या मानधन तत्त्वावर गेल्या वीस वर्षांपासून क्षयरोग विभागामध्ये वैद्यकीय कर्मचारी काम करत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ क्षयरोग सुपरवायझर, प्रोग्राम असिस्टंट कम डेटा एन्ट्री ऑपरेटर, पब्लिक प्रायव्हेट समन्वयक, टीबी हेल्थ विजिटर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ पर्यवेक्षक, डॉट प्लस सुपरवायझर, लेखापाल, औषधनिर्मिता, वाहनचालक इ. कर्मचार्‍यांचा यामध्ये समावेश आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT