पुणे

Pimpri News : पिंपळे गुरवमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

Laxman Dhenge

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील साठ फुटी रोडवरील विश्वकर्मा मंदिराला लागून भाऊनगर लेनमधील एका इमारतीत महावितरणच्या मीटरला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. ही आग बुधवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पिंपळे गुरव येथील भाऊनगर लेनमधील चार मजली असलेल्या श्री हाईट्स इमारतीत तळमजल्यावर शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ही आग जिन्याच्याकडेला भिंतींवर लावण्यात आलेल्या मीटरला लागली होती. या वेळी या भिंतीवर लावण्यात आलेले एकूण 12 मीटर जळून खाक झाले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी प्रशांत जाधव यांनी राहटणी तसेच वल्लभनगर अग्निशामक दलाला घटनेबाबत माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच दोन्ही अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली.

सुदैवाने जीवितहानी नाही

या वेळी सदनिकाधारक प्रशांत जाधव यांनी सांगितले, की महावितरण कर्मचारी यांना याआधी मीटर परिसरातील लाकडी आवरण काढून देण्यात यावे, अशी विनंती केली होती. मात्र, ते वेळेत न काढल्याने दुर्घटना घडली. या वेळी महावितरण कर्मचारी यांना विचारले असता त्यांनी संबंधित सदनिकाधारक यांना लाकडी आवरण असलेल्या बॉक्सच्या पट्ट्या निखळून कुजल्या आहेत. तरी मीटर परिसरातील स्वच्छता करून टाकण्यात यावी, अशी सूचना केली होती. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन दुर्घटना घडून आली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT