पुणे

पिंपरी : गुटखा विक्री करणार्‍यास अटक

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विक्रीसाठी पान शॉपमध्ये गुटखा ठेवल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. वाल्हेकरवाडी रोडवरील, न्यू वूड हॉटेलसमोरील कृष्णा पान शॉप येथे अंमली विरोधी पथकाने शनिवार (दि. 16) कारवाई केली.

अशोक राजेंद्रप्रसाद पांडे (42, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर, नसिम उस्मान तांबोळी (रा. पर्वती, पुणे) याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस शिपाई प्रसाद राजन्ना जंगीलवाड यांनी याबाबत चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने न्यू वूड हॉटेलसमोरील पान शॉपमध्ये 10 हजार 340 रूपये किंमतीचा गुटखा,

सुंगधित तंबाखू आणि पानमसाला विक्रीसाठी ठेवला होता. अंमली विरोधी पथकाने कारवाई करत एकाला अटक केली.

SCROLL FOR NEXT