पुणे

पिंपरी : दरोडाप्रकरणी पाच जणांना अटक

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चाकूचा धाक दाखवून लुटणार्‍या पाच जणांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 11) एक्सप्रेस वेवरील उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या विरुद्ध दिशेला घडली.

आदर्श अनिल चौधरी (19, रा.वर्सोली, लोणावळा), अजय गुलाब साळुंखे (19, रा. दत्तवाडी, मुळशी), संजय मारुती चव्हाण (22, रा. समतानगर, लोणावळा), गणेश राजू काळे (22, रा. वडगाव, मावळ) आणि अमृत रवी जाधव (रा. दत्तवाडी, मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी चालक जमाल कमल खान (37, रा. उत्तर प्रदेश) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस (शिरगाव चौकी) येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा भाऊ हे पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरुन जात होते.

दरम्यान, उर्से गावच्या हद्दीत असलेल्या फुड मॉलच्या विरुद्ध दिशेला ते लघुशंकेसाठी उभे राहिले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्याच्या भावाला चाकू व कोयत्याचा धाक दाखवून मोबाईल व रोख रक्कम असा 19 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, असे फिर्यादीत नमूद आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

SCROLL FOR NEXT