पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बावधन येथे एका पोत्यात हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी खुनाचा उलगडा करीत चौघांना अटक केली. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रांनी हा खून केल्याचे समोर आले आहे.
सुनील मुना चौहान (26, रा बावधन, पुणे. मुळ राज्य बिहार), मुन्ना फुनी चौहान (वय 40), योगेन्द्र श्रीगुल्ले राम (40, मुळ रा. उत्तर प्रदेश), बलिंदर श्रीगुल्ले राम (वय 36, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राजु दिनानाथ महातो (वय 36, रा. कोलकत्ता सध्या रा बावधान, पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अपर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन येथे पोत्यात एक अनोळखी मृतदेह मिळून आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना हिंजवडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी वेगवेगळ्या टिम करून चारही दिशांना रवाना केल्या.
घटनास्थळाजवळील सलग दोन दिवस रात्री सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना मयत बॉडी मिळण्याच्या पाच दिवसांपूर्वी रात्री संशयित दुचाकी दिसून आल्या.
पोलिसांनी संशयित गाडीबाबत माहिती घेतली असता ती गाडी बावधन येथील डी पॅलेस हॉटेलजवळ असणार्या चाळीत राहणार्या इसमांची असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चौघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता हा खून चौघांनी केला असल्याचे कबूल केले.
मयत राजु हा आरोपींबरोबरच बिगारी काम करायचा व सोबत राहत होता. राजु व सुनील चौहान यांच्यात झालेल्या वादावादीमुळे त्याने मयत इसम राजु महातो याचा हाताने गळा दाबुन खून केला.
त्यानंतर आरोपींनी त्याचे हात व पाय बांधून त्यास मोकळया पांढर्या रंगाच्या पोत्यात भरुन, दुचाकीवरुन हायवे लगत असणार्या नाल्यात टाकले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोन्याबापू देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, उपनिरीक्षक यलमार, सहाय्यक फौजदार बंडु मारणे,
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा सुरु, युक्रेन मुद्यावर पंतप्रधान मोदींशी चर्चा करणार
पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, अमर राणे, दत्ता शिंदे, महेश मोहोळ, विनोद मोहिते, मनोज गोसावी, आबा सावंत, संतोष डामसे यांनी ही कामगिरी केली.