पुणे

पिंपरी : दरवाढ, टंचाईमुळे वाहनचालकांचा संताप

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : 'सीएनजी'च्या दरात मंगळवारपासून पुन्हा वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी वापरणार्‍या वाहनधारकांच्या खिशाला चाट बसत आहे. 'सीएनजी'चा सध्याचा दर प्रतिकिलो 68 रूपये इतका आहे.

आठवडाभरापूर्वीच दरात घट होऊन प्रतिकिलो 62 रूपये दर ठरल्यानंतर लगेच दरात वाढ झाल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विधिमंडळात सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सीएनजीवरील मूल्यवर्धित कर(व्हॅट) कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यानुसार दरात घट देखील करण्यात आली होती.

सीएनजीचा दर 68 रुपये 50 पैशांवरून 62 रूपये 20 पैसे एवढा करण्यात आला होता. मात्र आठवडाभरातच त्यामध्ये 5 रूपये 80 पैशांची वाढ होवून सध्याचा सीएनजीचा दर 68 रूपये एवढा झाला आहे.

पेट्रोलच्या दरात वाढ होत असल्याने 'सीएनजी'वरील वाहन खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे; मात्र सीएनजीचे दर देखील आठवडाभरानंतर बदलत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात सीएनजी बाबतही प्रश्न निर्माण होत आहेत.

  • शहरातील सीएनजी केंद्रांची संख्या : 28
  • शहराची दररोजची मागणी : अडीच ते तीन लाख किलो गॅस
  • सीएनजी केंद्रांवर मोजकेच आउटलेट

फुगेवाडी येथील सीएनजी केंद्रातील काँम्प्रेसर मशिनमध्ये बिघाड झाल्याने केंद्र बंद आहे. शहरात मोजकेच केंद्र असून मध्यवर्ती ठिकाणचे केंद्र बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. परिणामी इतर केंद्रांवर ताण पडत असून वाहनांची रांग लागत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT