पुणे

पिंपरी : नागरिक टाकताहेत उघड्यावर कचरा

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरामध्ये कचरा कुंडी मुक्त वॉर्ड ही संकल्पना राबविली जात आहे. त्यामुळे शहर कचराकुंडी मुक्त करण्यात आले आहे. तरी देखील नागरिकांकडून उघड्यावर कचरा टाकला जात असून स्वच्छ शहर हा उद्देश फोल ठरत आहे.

यापूर्वी शहरात कचराकुंड्यामुळे अस्वच्छतेत भर पडत होती. कचरा वर्गीकरण न करता नागरिक कचरा कुंड्यामध्ये टाकत होते. भटकी कुत्री आणि जनावरे ही कचरा अस्ताव्यस्त पसरत होती. त्यासोबतच कचरा वेळेवर न उचलल्याने कचरा कुंड्या कचर्‍याने ओसंडून वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी व मच्छरांचा प्रादुर्भाव होत होता.

यासाठी शहरभर कचराकुंडी मुक्त वॉर्ड करण्यात आले आहेत. आता कचर्‍याच्या गाड्या घरोघरी जावून कचरा गोळा करत आहेत. कचराकुंडीमुळे होणारी दुर्गंंधी आणि घाण टाळण्यासाठी कचराकुंड्या हटविल्या आहेत. तरी देखील नागरिक उघड्यावर कचरा टाकताना दिसत आहेत.

बर्‍याच नागरिकांच्या वेळेत कचरागाडी येत नाही. तसेच घरातील सर्वजण नोकरी किंवा कामधंद्यानिमित्त बाहेर गेल्यामुळे देखील कचरा कुठे टाकावा हा प्रश्न निर्माण होत आहे. यासाठी सायंकाळी एखादी कचर्‍याची गाडी उपलब्ध व्हावी अशी मागणी नागरिक
करत आहेत.

SCROLL FOR NEXT