पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कारमध्ये ठेवलेली पाच लाख रुपयांची बॅग चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना चर्होली येथील प्राईड वर्ल्ड रोडवर शनिवारी (दि. 9) ही घटना घडली.
रोहित दामोदर रांदड (38, रा. मोशी, हवेली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चर्होली येथून दुचाकीवर जात आहे.
दरम्यान, आरोपीने फिर्यादी यांच्या कारला कट मारण्याच्या बहान्याने थांबून कारमधून 5 लाख रूपये असलेली बॅग पळवून नेली. दिघी पोलिस तपास करीत आहेत.