पुणे

पिंपरी : जुन्या भांडणाच्या रागातून खुनाचा प्रयत्न

backup backup

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून दहा जणांनी मिळून सहा मित्रांना कोयता व पालघनचे वार करून खुनाचा प्रयत्न केला. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक लुंडा कोकाटे (वय 18, रा. मोरया पार्क, पिंपळे गुरव) हे आपल्या सहा मित्रांसमवेत शनिवार (दि. 16) रोजी स. 11 वा.

काशिदनगर मित्र मंडळ गोविंद ग्रृप येथे फिरत असताना आरोपी विशाल उर्फ कांड्या पप्या काशिद, सचिन उर्फ टकल्या मेजर कोळकर, प्रसाद सोनटक्के, दीपक बागडे, पप्या गायकवाड, प्रसाद कदम, खंड्या साळुंखे सर्व राहणार पिंपळे गुरव, शाम शिंगे,

भावेश सरकार दोघेही रा. सदर, तर मनोज सरकार रा. कासारवाडी या आरोपिंनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना जुन्या भांडणाच्या रागातून कोयता व पालघनने कान आणि डोक्यावर वार करून खून करण्याचा प्रयत्न केला.

याविरोधात फिर्यादी यांनी सांगवी पोलिस ठाण्यात रविवार (दि. 17) रोजी दुपारी दीड वाजता खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सांगवी पोलिस करीत आहेत.

SCROLL FOR NEXT