पुरंदरमधील पिलाणवाडी धरण ओव्हरफ्लो; पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली  Pudhari
पुणे

Pilaanwadi dam overflow: पुरंदरमधील पिलाणवाडी धरण ओव्हरफ्लो; पिण्यासह शेतीच्या पाण्याची चिंता मिटली

पुरंदर तालुक्यातील सात धरणे भरली

पुढारी वृत्तसेवा

सासवड: पिलाणवाडी धरणाची एकूण साठवण क्षमता 67.45 दशलक्ष घनफूट आहे. सध्या धरण ओव्हरफ्लो झाले असून सांडव्यावरून पाणी वाहत असल्याची माहिती पाटबंधारेचे गराडे शाखा अधिकारी अविनाश जगताप यांनी दिली.

पिलाणवाडी तलावातून शिवरी परिसरातील खळद, एखतपूर-मुंजवडी, वाळुंज, निळुंज, बेलसर, तक्रारवाडी, साकुर्डे या गावांसाठी शिवरी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना चालू आहे. धरणातून 400 केव्ही विद्युत वितरण कंपनी जेजुरीस पाणीपुरवठा केला जातो. धरण भरल्याने पिलाणवाडी, खेंगरेवडी, हरगुडे, यादववाडी, सटलवाडी, परिंचे, पांगारे आदी गावांचा शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. या धरणावर परिसरातील 399 हेक्टर इतके क्षेत्र सिंचित होते. (Latest Pune News)

मे, जून व जुलै महिन्यात धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धरण 100 टक्के भरल्याचे सासवड पाटबंधारे शाखेचे संदेशक एस. एच. कोरपडे यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यातील पावसाची आतापर्यंतची आकडेवारी पुढीलप्रमाणे - सासवड 245 मि.मी., जेजुरी 297 मि.मी., भिवडी 240 मि.मी., परिंचे 190 मि.मी., राजेवाडी 270 मि.मी., वाल्हा 300 मि.मी., कुंभारवळण 205 मि.मी., शिवरी 140 मि.मी. पुरंदर तहसीलमधील लिपिक सोमनाथ आव्हाळे यांनी ही माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT