पुणे : प्रीमिनेंट एजुकेशन अॅण्ड रिसर्च असोसिएशन (PERA) अर्थात यपेराय या खासगी विद्यापीठांच्या संघटनेच्या वतीने यंदा दि. 24, 25 व 26 मे 2024 रोजी यसीईटीय परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस 19 मे असून परीक्षेचा निकाल 31 मे रोजी घोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती यपेरायचे अध्यक्ष व एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी दिली.
या परीक्षेसंदर्भात माहिती देण्यासाठी एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नालॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रा. डॉ. कराड बोलत होते. याप्रसंगी जीएसपीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. बी. अहुजा, डी. वाय पाटील विद्यापीठ अंबीच्या कुलगुरू डॉ. सायली गणकर, जी. एच. रायसोनी स्किल टेक विद्यापीठाचे कुलगरू डॉ. एम. यू. खरात, प्र. कुलगुरू डॉ. मोहित दुबे, यपेरायचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. हणमंत पवार, स्ट्रॅटेजिक सल्लागार प्रा. डॉ. सुराज भोयर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा. डॉ. कराड पुढे म्हणाले की, अधिक माहितीसाठी www. peraindia. in या संकेतस्थळाला भेट द्यावी. गेल्या पाच वर्षांपासून पेराच्या वतीने अशाप्रकारची परीक्षा यशस्वीपणे घेण्यात येत आहे.
हेही वाचा