पुणे

Pimpri news : नोकर भरतीतील उत्तीर्ण उमेदवार15 ऑक्टोबरपर्यंत रूजू होणार

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या नोकरभरती परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. त्यानंतर आरक्षणासह पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पुढील महिन्यात 15 तारखेपर्यंत सर्व 368 उमेदवारांना विविध पदांवर रूजू करून घेण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. महापालिकेच्या वेगवेगळ्या 15 पदांसाठी 368 जागांसाठी मे महिन्यामध्ये तीन दिवस राज्यभरातील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

त्यात प्रत्यक्षात 55 हजार जणांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर 11 पदांसाठी 35 जागांचा निकाल 7 ऑगस्टला जाहीर करण्यात आला. त्यात अतिरिक्त कायदा सल्लागार, विधि अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान निरीक्षक (वृक्ष), उद्यान निरीक्षक, हॉर्टिकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, अ‍ॅनिमल किपर, समाजसेवक, आरोग्य निरीक्षक या पदाचा समावेश होता. लिपिक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या चार पदांसाठी तब्बल 30 जार 581 अर्जदार बसले होते. त्यांचा निकाल 30 ऑगस्टला जाहीर करण्यात आला.

पहिल्या टप्प्यातील निकाल प्रसिद्ध करून आरक्षणासह यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. तर, दुसर्‍या टप्प्यातील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्यानंतर नियुक्तीपत्र देऊन त्यांना कामावर रूजू करून घेण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

पडताळणीनंतर नियुक्तीपत्र देणार

दुसर्‍या टप्प्यातील नोकरी भरतीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यादी महाापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आरक्षणानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासणीचे काम सध्या सुरू आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीसमोर अहवाल देऊन पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात येईल, असे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT