खडकवासला: गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर शनिवारी (दि. 9) पानशेत, वरसगाव आणि टेमघर खोर्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली. काही भागांत जोरदार सरी कोसळल्या, तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. सायंकाळी 5 वाजता खडकवासला धरणसाखळीत एकूण 25.81 टीएमसी म्हणजे 88.54 टक्के पाणीसाठा नोंदवला गेला.
शनिवारी दिवसभरात पानशेत खोर्यात येथे 3 मिलिमीटर, तर वरसगाव आणि टेमघर धरण परिसरात प्रत्येकी 2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणमाथ्यावर पाऊस झाला नसला, तरी खानापूर-गोर्हे भागात दुपारी हलक्या सरी कोसळल्या. (Latest Pune News)
चारही धरणक्षेत्रांत सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी सिंहगड-खानापूर भागात जोरदार सरी कोसळल्या. मात्र, पानशेत व वरसगाव परिसरात पाऊस तुरळक होता. सायंकाळी घाटमाथा आणि डोंगरी पट्ट्यात धुक्याची चादर पसरली होती. गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस नसल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक मंदावली असून, पाणीसाठ्यात घट नोंदवलीजात आहे.
खडकवासला धरणसाखळी
एकूण पाणी साठवणक्षमता 29.15 टीएमसी
शनिवारचा पाणीसाठा
25.81 टीएमसी (88.54 टक्के)