पुणे

Ganeshotsav 2023 : हिरव्या, निळ्या डोळ्यांमधून प्रकटतोय भक्तिभाव

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  मूर्ती रंगविताना सर्वांत आवाहानात्मक काम म्हणजे डोळे. कलाकारांच्या भाषेत त्याला लिखाई किंवा आखणी म्हटले जाते. डोळे रेखाटताना भाविक मूर्तीचे दर्शन घेतील त्या वेळी मूर्तीची नजर आपल्याकडे आहे, असा भाव दिसला पाहिजे. यादृष्टीने डोळ्यांचे काम करण्यात येते. लेन्सच्या वापरामुळे हिरव्या, निळ्या रंगातील डोळे रेखाटण्याकडे रंगकाम करणार्‍यांचा कल असल्याचे गणेशमूर्तींना रंगकाम करणारे अमित कलाल सांगतात.

कलाल हे मागील नऊ वर्षांपासून शहरातील मानाच्या चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपती रंगविण्याचे काम करतात.
लोहगाव येथील गणेश आर्ट्सचे गणेश कुंभार म्हणाले, गणरायाच्या डोळ्यांची सुबक आखणी करण्यासाठी अनेक वर्षांची मेहनत लागते. घरगुती असो की सार्वजनिक गणेशमूर्ती ही डोळे पाहूनच खरेदी करण्यात येते. कारण सुंदर डोळ्यांमुळे मूर्तीचा चेहराही उठून येतो.
शिल्पकार विपुर खटावकर म्हणाले, गणपतीची मूर्ती रंगविण्याचे काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होते. मूर्तींच्या डोळ्याच्या रचनेनुसार त्यांचे रंगकाम होते. काही मूर्तींचे डोळे हे पूर्ण उघडे असतात, तर काहींचे अर्धवट उघडे असतात. डोळ्यांच्या रचनेवर भाव निर्माण होतात.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT