Pune Accident Pudhari
पुणे

Pune Accident: ट्रक-स्कुटी धडकेत तरुणीचा मृत्यू; ओतूर येथील मोनिका चौकात भीषण अपघात

धडकेची तीव्रता इतकी होती की स्कुटीवरील महिला चालकाचाजागीच मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

ओतूर: ओतूर (ता. जुन्नर) येथील मोनिका चौकात शुक्रवारी (दि. ३) सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास ट्रक व स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण धडकेत एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल रवींद्र अहिनवे (वय २८, रा. अहिनेवाडी, ता. जुन्नर) असे घटनास्थळी ठार झालेल्या स्कुटीचालक तरुणीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक आणि स्कुटी यांच्यात मोनिका चौकात जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की स्कुटीवरील महिला चालकाचाजागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार भारती भवारी, शामसुंदर जायभाये, किशोर बर्डे, धनंजय पालवे, विश्वास केदार तसेच ट्रॅफिक वॉर्डन शुभम काशीद यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व पंचनामा करण्याची कार्यवाही सुरू केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT