Opportunity for technical education students to change institutions in pune
तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना संस्था बदलण्याची संधी Exam file photo
पुणे

Pune Education News| तंत्रशिक्षणच्या विद्यार्थ्यांना संस्था बदलण्याची संधी

पुढारी वृत्तसेवा

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय, शासन अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, फार्म डी, वास्तुशास्त्र व एचएमसीटी पदवी अभ्यासक्रमाच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षानंतर पाठ्यक्रम बदल, तसेच पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षानंतर संस्था बदल करता येतो. त्यासाठी विद्यार्थ्यांना येत्या १९ जुलैपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.

विद्यार्थ्याने प्रथम व द्वितीय सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण, पाठ्यक्रम / पाळी / संस्था बदलीस विनंती केलेल्या शाखेत संबंधित संस्थेत रिक्त जागांची उपलब्धता, तसेच विद्यापीठ बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता तपासून संधी देण्यात येणार आहे.

प्रथम वर्ष उत्तीर्ण, द्वितीय वर्षाच्या परीक्षेमध्ये तृतीय व चतुर्थ सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण, संस्था बदलीस विनंती केलेल्या संस्थेतील संबंधित वर्ग शाखेत रिक्त जागांची उपलब्धता व विद्यापीठ बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.

चौथ्या वर्षात प्रथम व द्वितीय वर्ष उत्तीर्ण, तृतीय वर्षाच्या परीक्षेमध्ये पाचवे व सहावे सत्र उत्तीर्ण किंवा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक विषयांपैकी एका विषयात अनुत्तीर्ण, पाठ्यक्रम / पाळी / संस्था बदलीस विनंती केलेल्या संस्थेतील संबंधित वर्ग शाखेत रिक्त जागांची उपलब्धता व विद्यापीठ बदल होत असल्यास विद्यापीठाने निर्धारित केलेली पात्रता पाहिली जाणार आहे.

SCROLL FOR NEXT