पुणे

विरोधक आले एका व्यासपीठावर; भाजपची मंडळी अजित पवारांच्या बैठकीत

Laxman Dhenge

बारामती : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या राजकारणात कधीही मोठे होणार नाहीत याची काळजी घेतलेली, अजित पवार यांना तालुक्यात गेली अनेक वर्षे कडाडून विरोध करणारे भाजपची नेतेमंडळी त्यांच्यासोबत एका व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसल्याचे चित्र मंगळवारी (दि. 16) बारामतीत दिसले, त्यामुळे या नेत्यांसाठी अनेकांचे शत्रुत्व ओढावून घेतलेले कार्यकर्ते मात्र अचंबित झालेले दिसले. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो, हे अधोरेखित झाले.

राजकीय ईर्षेपोटी कार्यकर्ते अनेकदा समोरच्याशी पंगा घेतात. राजकारण, त्यातील निवडणुका यामुळे बारामती तालुक्यातही यापूर्वी दोन विरोधी गटात धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सहयोग सभागृहात भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिलीप खैरे, अविनाश मोटे, सतीश फाळके, माजी नगराध्यक्ष सुनील पोटे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT