पुणे

उजनी धरणात केवळ 1.30 टीएमसी पाणीसाठा; पाणीपातळी मायनसमध्ये जाण्याची भीती

अमृता चौगुले

पळसदेव : पुढारी वृत्तसेवा

उजनी धरणात सद्य:स्थितीत केवळ 1.30 टीएमसी जिवंत पाणीसाठा आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांत पाणीसाठा मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत. दर वर्षी सोलापूर शहराला पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते.

हे पाणी नदीद्वारे सोडण्यात येत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. त्यामुळे बंद पाइपलाइनमधून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होते. परंतु, तेही काम रेंगाळले आहे. पावसाळ्यात उजनी धरणामध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाला होता. त्यामुळे यंदा धरण मायनसमध्ये जाणार नाही, असे वाटत होते.

मात्र, येत्या तीन दिवसांमध्ये पुन्हा धरण मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी जलाशयात पाणीसाठा 64.96 टीएमसी आहे. त्यापैकी 1.30 टीएमसी जिवंत साठा आहे. मृत पाणीसाठा 63 टीएमसी आहे. सध्याची जलाशयाची टक्केवारी 2.43 टक्के आहे. वेळेत पाऊस सुरू झाला नाही, तर पाणलोट क्षेत्रातील शेतकर्‍यांना पिके वाचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

विसर्ग

सीना माढा :               296 क्युसेक
दहिगाव उपसा सिंचन : 88 क्युसेक
मुख्य कालवा :          1400 क्युसेक
कालवा :                     70 क्युसेक
वीजनिर्मिती :                       बंद

हेही वाचा

SCROLL FOR NEXT