पुणे

दागिन्याबाबत विचारणा केल्याने त्याने केला थेट आईवर वार

Laxman Dhenge

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरातील दागिन्यांबाबत विचारणा केल्याने मुलाने थेट आईवर चाकूने वार केले. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.11) थेरगाव येथे घडली आहे. याप्रकरणी आईने वाकड पोलिस ठाण्यात फियाद दिली आहे. त्यानुसार, ओंकार ईश्वर बामणे (19, रा. थेरगाव) या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा ओंकार याला घरातील कपाटातील दागिन्याबाबत विचारणा केली.

तू दागिने विकले की गहाण ठेवले, दागिने कोठे आहेत, सांग नाही तर पोलिसांना बोलावते, अशी तंबी दिली.
याचा राग आल्याने आरोपीने थेट घरातील चाकूने जन्मदात्या आईचे डोके आणि हातावर वार करत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे. वाकड पोलिस तपास करत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT