देहूगाव(पुणे) : धावत्या रेल्वेतून पडून एका 65 वर्षीय अनोळखी वृद्ध व्यक्तिचा मृत्यू झाला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अहवालात सांगण्यात आले आहे. ही घटना रविवारी (दि. 11) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास देहूरोड रेल्वे किमी नंबर 166/35 जवळ घडली.
वृद्धाचा मजबूत बांधा, उंची अंदाजे सव्वापाच फूट, वर्ण सावळा, चेहरा उभट असून, त्यांच्याजवळ देहूरोड ते कामशेत दरम्यानच्या रेल्वे प्रवासाचे तिकीट आढळून आले आहे. संबंधित अनोळखी मृत व्यक्तीविषयी कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी रेल्वे पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम करदाळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
हेही वाचा