देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : किवळे, मामुर्डी, साईनगर, विकासनगर, आदर्शनगर, देहूगाव, माळीनगर विठ्ठलनगर, बोडकेवाडी, तळवडे परिसरात मोठ्या संख्येने भाडेकरू राहतात. त्यामुळे येथील घरमालकांनी भाडेकरार करुन त्याची एक प्रत पोलिसांना देण्याचे आवाहन देहूरोड पोलिसांनी केले आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार
प्रत्येक घरमलकाने भाडेकरूची पूर्ण माहिती देहूरोड पोलिस ठाण्याला वेळेत न सादर केल्यास संबंधित घरमालका विरुद्ध कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी भाडेकरूची पोलिस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय भाडेकरूंना सोसायटीमध्ये प्रवेश देऊ नये. तसेच, प्रवेश दिल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असाही इशारा दिला आहे.
गुन्हेगारी रोखण्यास मदत होणार
ऑनलाइनद्वारे भाडेकरूची व्हेरिफिकेश केल्यास त्याची एक प्रत पोलिस ठाण्यात घरमालकाने देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोणी मोठी अनामत ठेव मागत असेल पोलिसांना कळवावे त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सध्या घर भाड्याने देऊन पैसे मिळविण्याचा व्यवसाय तेजीत सुरू आहे.
घर भाड्याने देताना घरमालक संबधित भाडेकरूची संपूर्ण माहिती न घेता, भाडे करार न करता भाडेकरू देतात. त्यामुळे देहूरोड परिसरात अनेक गुन्हे घडत आहेत. त्यामुळे भाडेकरार करुन त्याची एक प्रत देहूरोड पोलिसांना देण्याचे आवाहन देहूरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिंगबर सूर्यवंशी यांनी केले आहे.
हेही वाचा :