पुणे

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांची ‘मायमराठी’कडे पाठ !

अमृता चौगुले

पुणे : नीट प्रवेश परीक्षेत राज्यातील विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाकडे पाठ फिरविली आहे. मराठी माध्यमातून ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वर्षागणिक कमी होत आहे. 2019 मध्ये 31 हजार 239 विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमातून परीक्षा दिली होती. यंदा 1 हजार 833 विद्यार्थ्यांनी दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाकडून घेण्यात आलेल्या (एनटीए) नीट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा देशभरातील 4 हजार 97 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली.

नीट ही परीक्षा एकूण 13 भाषांमध्ये देता येते. दर वर्षी मराठीतून परीक्षा देणा-यांचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी इंग्रजीतूनच परीक्षा देण्याला पसंती देत असल्याचे दिसते. देशात परीक्षेसाठी सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी महाराष्ट्रातून होत असताना मराठी भाषेतून परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांचा टक्का मात्र नगण्य असून, तोही दर वर्षी कमीच होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT