पुणे

निगडी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचे काम पूर्ण होऊनही बंद अवस्थेत

Sanket Limkar

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निगडी येथील अमरधाम स्मशानभूमी येथे नवीन विद्युत दाहिनी बसविण्यात आली आहे. त्याचे संपूर्ण काम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले आहे. तरीही विद्युत दाहिनी सुरू केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
स्मशानभूमी येथील नवीन विद्युत दाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. त्या कामाच्या उद्टनासाठी राज्यातील वरिष्ठ नेत्यास बोलविण्यात येणार आहे. त्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडले असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ही विद्युत दाहिनी केल्या दोन महिन्यांपासून बंद स्थितीत आहे. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणार्‍यांची गैरसोय होत आहे.

निगडी गावठाण, यमुनानगर, त्रिवेणीनगर, तळवडे, चिखली, कुदळवाडी, मोशी, आकुर्डी, प्राधिकरण या परिसरातील नागरिक या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येतात. जुन्या विद्युत दाहिनीवर कॉईल नादुरुस्त झाल्याने अधिक वेळ जात असल्याने मनस्ताप होत आहे. नवीन विद्युत दाहिनी लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT