Election Analysis Pudhari
पुणे

Pune Municipal Election Analysis: नवी पेठ–पर्वती प्रभागात भाजपचे वर्चस्व कायम

विकास, पाणीपुरवठा व वाहतूक मुद्द्यांवर मतदारांचा कौल; अंतर्गत नाराजीनंतरही भाजपला यश

पुढारी वृत्तसेवा

सुनील जगताप

पुणे: प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ-पर्वती हा प्रभाग कायमच राजकीय संवेदनशील आणि चुरशीचा प्रभाग राहिला आहे. या प्रभागामध्ये च्या निवडणुकीत भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी झाले होते. 2017 च्या निवडणुकीतही भाजपने आपला कायम राखण्यात यश मिळविले आहे.

या प्रभागात प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी विशेषतः राष्ट्रवादी काँग््रेास - शरद पवार गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली. नवी पेठ आणि पर्वती परिसरात सुशिक्षित आणि मध्यमवर्गीय मतदारांची संख्या मोठी आहे. या मतदारांनी विकासाच्या मुद्द्‌‍यांना प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. पर्वती दर्शन आणि दत्तवाडी परिसरातील वस्त्यांमध्ये मतदानाचे प्रमाण जास्त राहिले, तर नवी पेठेतील सोसायट्यांमध्ये मतदानाचा अपेक्षेपेक्षा कमी होता.

या निवडणुकीच्या काळात चोवीस तास पाणीपुरवठा योजना आणि वाहतूक कोंडी हे प्रचाराचे मुख्य मुद्दे होते. ज्या उमेदवारांनी यावर ठोस आश्वासन दिले, त्यांना मतदारांनी पसंती दिल्याचे निकालावरून दिसून येते. हा भाग भाजपचा मानला जातो. माजी नगरसेवकांचा जनसंपर्क आणि पक्षाची मजबूत बांधणी यामुळे भाजपला येथे आघाडी मिळत असते. दरम्यान भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने तरुण चेहऱ्यांना संधी देऊन भाजपच्या मतांमध्ये फूट प्रयत्न केला. विशेषतः दत्तवाडी आणि परिसरात चांगला प्रतिसाद मिळाला.

हा प्रभाग भारतीय जनता पक्षाचा मानला जातो. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजपला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागला. तिकीट वाटपावरून भाजपमध्ये नाराजी उफाळून आली होती. इच्छुक उमेदवार धनंजय जाधव यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग््रेास (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करण्याची भूमिका घेतली. धीरज घाटे, स्मिता वस्ते आणि लता गौडा यांसारख्या दिग्गज उमेदवारांनी भाजपची धुरा सांभाळली.

लोकमान्य नगरमधील मिळालेली स्थगिती आणि स्थानिक आमदार हेमंत यांच्यावर झालेले आरोप यांमुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात नाराजी दिसून येत होती. लोकमान्य नगर आणि आसपासच्या जुन्या वाड्यांच्या आणि सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा रखडलेला प्रश्न हा निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरला. ‌‘पक्ष महत्त्वाचा की असा प्रश्न या निवडणुकीत प्रामुख्याने चर्चेत राहिला. निवडणुकीपूर्वी धनंजय जाधव यांनी भाजपमधून बंडखोरी केल्याने मराठा मतांमध्ये फूट पडेल अशी चर्चा होती. मात्र, अंतिम निकालात असे दिसून आले की, मतदारांनी आणि याला अधिक महत्त्व दिले.

म्हणून येथे मिळाली पसंती

स्मिता वस्ते आणि धीरज घाटे यांसारख्या अनुभवी नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील जनसंपर्क टिकवून ठेवला होता. भाजपच्या चारही उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचार केल्याचा फायदा त्यांना झाला. नवी पेठ आणि पर्वती हा भाग भाजपचा असल्याने येथील मध्यमवर्गीय मतदारांनी पुन्हा एकदा कमळालाच पसंती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT