पुणे: नवले पुलाजवळील भीषण अपघातानंतर येथे चक्काचूर झालेली वाहने प्रशासनाकडून हटवण्यात आली आहेत अन् अपघातामुळे बंद झालेला मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.14) पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आला आहे. तसेच, अपघातास कारणीभूत ठरलेला नियंत्रण सुटलेला ट्रेलरदेखील रस्त्याच्या एका बाजूला उभा करण्यात आला आहे.
याशिवाय जळालेला दुसरा ट्रकदेखील रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही, असा उभा करण्यात आला आहे. गुरुवारी येथे झालेल्या भीषण अपघातामुळे येथील महामार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती, अखेर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरळीत झाल्याचे चित्र दिसले.
नवले पुलाजवळून महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत
नवले पुलाजवळील भीषण अपघातानंतर येथे चक्काचूर झालेली वाहने प्रशासनाकडून हटवण्यात आली आहेत अन् अपघातामुळे बंद झालेला मुंबई-पुणे-बंगळूर महामार्ग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.14) पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आला आहे. तसेच, अपघातास कारणीभूत ठरलेला नियंत्रण सुटलेला ट्रेलरदेखील रस्त्याच्या एका बाजूला उभा करण्यात आला आहे. याशिवाय जळालेला दुसरा ट्रकदेखील रस्त्याच्या बाजूला वाहतुकीला अडथळा होणार नाही, असा उभा करण्यात आला आहे. गुरुवारी येथे झालेल्या भीषण अपघातामुळे येथील महामार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली होती, अखेर दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरळीत झाल्याचे चित्र दिसले.
पोलिसांच्या अपूर्ण नियोजनामुळेच हा अपघात घडला आहे. महामार्ग पोलिस केवळ सकाळच्या वेळेत अवजड वाहनांना शहर हद्दीतील या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालतात. पण, सायंकाळी अपघाताची शक्यता जास्त असताना साताऱ्याकडील वाहनांना सर्रासपणे प्रवेश देतात, हे धोरण त्यांनी आता तत्काळ बदलण्याची गरज आहे. जर गुरुवारी (दि. 13) सायंकाळी साताऱ्याकडून पुण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना पिक अवरला रोखले असते, तर कदाचित कालचा भीषण अपघात टाळता आला असता; मात्र हे घडले नाही. नवले पुलाजवळून जाणाऱ्या रस्त्यावर किमान पिक अवरमध्ये (दोन्ही दिशेने) तरी बंदी करावी आणि बंदीची वेळ स. 7 ते दु. 12 आणि सायंकाळी 4.30 ते रात्री 12.30 असावी.प्रांजली देशपांडे-आगाशे, वाहतूक अभ्यासकसध्या
सकाळी 7 ते 11 या वेळेत साताऱ्याकडून (दक्षिण भाग) पुण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना निरा नदीजवळील केसुर्डी येथे थांबविले जाते आणि सायंकाळी 5 ते 11 या वेळेत मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आणि नव्या एक्स्प्रेस वेवर रोखले जाते. मात्र, साताऱ्याकडील वाहनांना सायंकाळी रोखण्यासाठी आमच्याकडे अतिरिक्त मनुष्यबळाची कमतरता आहे. मनुष्यबळासाठी आम्ही शहर पोलिसांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर सायंकाळच्या पिक अवरमध्ये अवजड वाहनांना शहर हद्दीत येण्यापासून रोखणे सोपे होईल.विक्रांत देशमुख, महामार्ग पोलिस अधीक्षक, पुणे विभाग