Nasrapur Traffic Jam Pudhari
पुणे

Nasrapur Traffic Jam: नसरापूरमध्ये अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी

भोर-वेल्हा मार्गावर नागरिक त्रस्त; प्रशासनाकडून ठोस कारवाईची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

नसरापूर: भोर आणि वेल्हा तालुक्याला जोडणारी महत्त्वाची बाजारपेठ म्हणून नसरापूरची ओळख आहे. मात्र, येथील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमण, अस्ताव्यस्त वाहनांच्या पार्किंगमुळे कायम वाहतूक कोंडी होते. याबाबत राजगड पोलिस आणि ग््राामपंचायतीकडून ठोस कारवाई करण्याऐवजी टोलवाटोलवी होत आहे. त्यामुळे नसरापूरला लागलेले कोंडीचे ग््राहण कधी सुटणार असा प्रश्न नागरिकांसह प्रवासी उपस्थित करत आहेत.

नसरापूर गावातून वेल्हाकडे मढेघाट, राजगड, तोरणा किल्ला, बनेश्वर क्षेत्र, गुंजवणी धरण या पर्यटनस्थळाकडे जाता येते. मात्र, रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना अतिक्रमणे दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यामुळे नागरिकांसह पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. या वाहतूक कोंडीतून अनेकदा रस्त्यावर वादाचे प्रकार घडले आहेत.

या वाहतूक कोंडीबाबत राजगड पोलिसांनी आणि नसरापूर ग््राामपंचायत प्रशासन ठोस भूमिका घेताना दिसत नाही. त्यांच्याकडून एकमेकांना अतिक्रमण काढण्याच्या लेखी सूचना केल्या जातात. तसेच या समस्येबाबत आजी-माजी पदाधिकारी चुप्पी साधत असल्याचे दिसून येते.

प्रभारी सरपंच उषा कदम यांनी वाहतूक कोंडी राजगड पोलिसांचे लक्ष वेधले आहे. मात्र, काही ग््राामपंचायत सदस्यांनी अतिक्रमण हे बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याचे सांगून या कारवाईत आडकाठी आणल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, वाहनांबाबत सम-विषम पार्किंग व्यवस्था केल्यास वाहतूक कोंडी टळू शकते, अशी चर्चा आहे.

नसरापूरमध्ये अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. संबंधित अतिक्रमणे काढून घेण्यासंदर्भात ग््राामपंचायतीने कारवाई करावी. त्यासाठी पोलिस संरक्षण देऊ, असे राजगडचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी स्पष्ट केले.

नसरापूर येथील वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. अतिक्रमण काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांची मदत घेणार आहोत.
चंद्रकांत विपट, गटविकास अधिकारी, ग््राामपंचायत प्रशासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT