पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील बहुतांश भाग रात्री अन् पहाटे थंडीने गारठत असून रविवारी (दि. 25) पुणे 10, तर नाशिकचा पारा 10.2 अंशांपर्यंत खाली आला होता. दरम्यान, राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. सोमवारी-मंगळवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. बंगालच्या उपसागरात प्रतिचक्रवात निर्माण झाल्याने वार्यांचा वेग वाढला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात
सोमवारी व मंगळवारी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने हिमालयात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरपासून पंजाबपर्यंतचा परिसर गारठला आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशपर्यंतची राज्ये गारठली असून महाराष्ट्रातही त्याचा परिणाम होत आहे. हवेच्या वरच्या स्तरात वार्यांचा वेग ताशी 260 ते 300 किलोमीटर वेगाने सुरूच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही थंडी आणि पाऊस, असे विचित्र हवामान तयार झाले आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा हा दहा ते चौदा अंशांपर्यंत खाली आला आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांतील तापमान खाली गेले आहे.
हेही वाचा