पुणे

नारायणगाव सोसायटीचे सव्वातेरा कोटींचे पीककर्ज वाटप; नियमित कर्ज भरणार्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रस्ताव

अमृता चौगुले

नारायणगाव, पुढारी वृत्तसेवा: नारायणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने सन 2022-23 या आर्थिक वर्षात 996 सभासदांना 13 कोटी 25 लाख रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. नियमित कर्ज भरणार्‍या 1151 शेतकर्‍यांना प्रत्येकी पन्नास हजारांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संतोषनाना खैरे व उपाध्यक्ष किरण वाजगे यांनी दिली.

चालू सन 2022-23 या खरीप हंगामामध्ये 996 सभासदांना रक्कम रुपये 13 कोटी 25 लाख टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, ऊस या विविध पिकांसाठी कर्ज वाटप करण्यात आले आहे. यापैकी नवीन 105 सभासदांची 43 लाख पन्नास हजार रुपयांची वाढ झाली आहे. तसेच येत्या काळात रब्बी हंगामात होणारे कर्जवाटप लक्षात घेता साधारणतः एकूण पीक कर्ज 29 ते 30 कोटींचे वाटप करण्याचा मानस संस्थेच्या संचालक मंडळाने व्यक्त केला.

राज्य शासनाने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून रुपये 50 हजार देण्याचे जाहीर केले असून त्यासंदर्भात संस्थेच्या 1151 सभासदांची माहिती संस्थेने राज्य शासनाकडे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सुपूर्द केली आहे. तसेच मागील हंगामामध्ये राज्य शासनाने शेतकर्‍यांकडून व्याज वसूल केले आहे. सदर व्याज परताव्याचा प्रस्ताव संस्थेने राज्य शासनास सादर केला आहे, असे खैरे यांनी सांगितले.

यापुढील काळात संस्थेच्या वतीने खते, औषधे, बी-बियाणे, शेती उपयोगी अवजारे यांचा व्यवसाय करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट फंडद्वारे बहुद्देशीय व्यवसाय सुरू करण्यासाठी संस्थेच्या मालकीच्या सहा गुंठे जागेमध्ये व्यापारी संकुल उभारणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव गणेश गाडेकर यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT