पुणेः मुकेश छाजेड यांची दि. पुना मर्चंट चेंबरच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झाली आहे. पुण्यातील जैन समाजातील प्रतिष्ठीत उद्योजक, सेवाभावी व्यक्तीमत्व, व्यवसायिक क्षेत्रात नावलैकीक असलेल्या सिद्धी ग्रुपचे सदस्य अशी छाजेड यांची ओळख आहे.
जेष्ठ बंधू उद्योजक मनोज छाजेड यांच्या मार्गदर्शनाखाली मुकेश व्यवसायाबरोबरच सामाजिक क्षेत्रात देखील कार्यरत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दस सर्व स्तरातून कौतूक होते आहे. (Latest Pune News)
मुकेश छाजेड यांनी समाजहितासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक वर्षी ते सिद्धी ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. मागील 18 वर्षापासून त्यांचे अविरत सेवेचे हे व्रत सुरू आहे. कोरोना असो की अन्य नैसर्गिक आपत्ती अशा संकटाच्या काळात मुकेश यांनी जितोच्या माध्यमातून गरजू नागरिकांना अन्नधान्य,आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली आहे. सद्या मुकेश जितो पुणेचे डारेक्टर म्हणून कार्यरत आहेत.
याबाबत बोलताना मुकेश यांनी सांगितले, ही निवड माझ्यासाठी केवळ सन्मान नाही, तर समाजासाठी चांगेल काम करण्याची मोठी संधी आहे. समाजाच्या विश्वासाला उतरून अधिकाधिक सेवाभावी उपक्रम हाती घेण्याचा माझा संकल्प आहे.