पुणे: उन्हाळी सुट्ट्यांमुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) सर्व निवासस्थानांमध्ये 31 मेपर्यंत आरक्षण फुल झाले असून, मागणी वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीने खासगी निवासस्थानांमध्ये ‘बेड अँड बेकफास्ट’ या कल्पनेंतर्गत सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. प्रामुख्याने थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांचा मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे दिसून येत आहे.
पुणे विभागांतर्गत पानशेत, भीमाशंकर, माळशेज घाट, कार्ला, महाबळेश्वरसह इतर ठिकाणी पर्यटकांची प्रचंड गर्दी असल्याने आरक्षणासाठी ऑनलाइन संकेतस्थळावर वारंवार मागणी होत आहे. त्याचबरोबर कोयना तलाव, ग््रेाप पार्क आदी प्रमुख निवासस्थाने उपलब्ध आहेत.
या ठिकाणी इन-हाउस रेस्टॉरंट, पार्किंग, गार्डन एरिया, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. पानशेत रिसॉर्टमध्ये तलावकिनारी वातावरण, स्विमिंग पूल व रूम सर्व्हिस उपलब्ध असल्याने कुटुंबांसाठी लोकप्रिय आहे. भीमाशंकर येथे इको-टुरिझम व तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, निसर्गरम्य वातावरणात शांतता मिळत असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
पर्यटकांसाठी पुरेपूर सोयी सुविधा उपलब्ध
एमटीडीसीने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आणि व्यवस्थित लाइटिंगची व्यवस्था केली आहे. बहुतेक रिसॉट्र्समध्ये 24 तास पाणी व वीज पुरवठा, स्वच्छता व आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. महाबळेश्वर व पानशेतसारख्या ठिकाणी कुटुंबीयांसाठी स्पेशल पॅकेजेस उपलब्ध असून, खाद्यपदार्थांची गुणवत्ता चांगली ठेवण्यावर भर दिला जात आहेत.
उन्हाळी सुट्टीत मागणी प्रचंड वाढल्याने आरक्षण पूर्ण होत आहे, तरी पर्यटकांकडून मागणी होत आहे. पर्यटनाच्या ठिकाणी बेड अँड बेकफास्ट सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार पर्यटकांनी नियमांचे पालन करून पर्यटन करावे. गर्दीच्या काळात वाहतूक व पार्किंगची काही अडचणी निर्माण न करता पर्यटनाचा सुरक्षित आनंद घ्यावाहनुमंत हेडे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी, पुणे