पुणे : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेत आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या पुणे विभागाच्या वतीने 589 जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जादा गाड्यांमुळे खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र विदर्भात जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे. (Latest Pune News)
एसटीच्या या जादा गाड्या दिनांक 15 ऑक्टोंबर ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान पुणे विभागातील शिवाजीनगर (वाकडेवाडी), पिंपरी-चिंचवड, स्वारगेट स्थानकांवरून खान्देश, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाकरिता सोडण्यात येणार आहेत. तसेच, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मैदानातून सुद्धा या जादा सोडण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. तसेच, यंदा दिवाळीनिमित्त जादा भाडे वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी पुणे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी केले.
बसस्थानक जादा बस
शिवाजीनगर : 80 बस
स्वारगेट : 113
पिंपरी-चिंचवड : 396
एकूण बस : 589