Rohit Pawar pudhari photo
पुणे

MPSC Student Protest : ...अन्यथा, विद्यार्थी दोन दिवसांत पुणे बंद करतील; रोहित पवारांचा राज्‍य सरकारला इशारा

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आंदोलनाला उपस्थिती दर्शवणार

पुढारी वृत्तसेवा

MPSC protest Pune Rohit Pawar

पुणे, पुढारी वृत्तसेवा : राज्‍य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष विवेक भीमनवार यांचा राजीनामा घेतला नाही, तर पुढील ४८ तासांनंतर विद्यार्थी पुणे बंद करतील, अथवा मुंबई मंत्रालयावर धडकतील, असा इशारा आमदार रोहित पवार यांनी आंदोलनाच्या पाचव्या दिवशी दिला. तसेच, हा राजकारणाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे स्पष्ट करत मत्स्यव्यवसाय आणि बंदरविकासमंत्री नितेश राणे यांच्यावर उपरोधिक टीकाही त्‍यांनी केली.

नितेश राणे भरकटलेले आहेत

रोहित पवार यांनी आंदोलन करावे. परंतु, विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी करत त्यांना हा राजकारणाचा मंच नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे, अशा शब्दांत सुनावले. तसेच ते मंत्री होतील, असे विधानही केले होते. त्यावर प्रत्युत्तर देताना पवार यांनी राणे हे भरकटलेले आहेत. मला सोबत मंत्री होतील, म्‍हणत आहेत याचा अर्थ आमचे सरकार येणार आहे आणि राणे भाजपला सोडचिठ्ठी देणार आहेत असा होतो, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.

आंदोलनासाठी राहुल गांधी येणार

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस असून, या आंदोलनात विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे. येत्या बुधवारी किंवा गुरुवारी (दि. ८-९ ऑक्‍टोबर ) लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थिती दर्शवणार आहेत. यावेळी एक लाखाहून अधिक विद्यार्थी रस्त्यावर असतील, त्यामुळे पुणे बंद पडेल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला. व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT